पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. कमलाकर इंगळे यांना राज्यशास्त्र या विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादतर्फे पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे.
प्रा. कमलाकर इंगळे यांनी “भंगी अनुसूचित जातीचे लोक लोकशाही प्रक्रियेतील सामाजिक व राजकीय स्थान’, “जळगांव शहर एक अभ्यासक” या विषयावर प्रबंध सादर केला होता. प्रा. कमलाकर इंगळे यांना एन. एस. एम. आर. एस. विद्यालय, चौथाळा (बीड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुजा साकिर यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. कमलाकर इंगळे यांना पी.एच.डी. पदवी प्राप्त झाल्याने त्यांचे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ,व्हा चेअरमन विलास जोशी, मानद सचिव अॅड. महेश देशमुख, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, प्रा. डॉ. श्रावण तडवी यांनी अभिनंदन केले आहे.