पाटणा वृत्तसंस्था । पहिल्या लढतीत यु मुंबाच्या संघाला बंगाल वॉरियर्सकडून निसटता पराभव दि. 9 ऑगस्ट रोजी पत्करावा लागला.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मुंबा आणि बंगाल यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला. अखेरच्या क्षणापर्यंत हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. पण अखेर बंगालने मुंबा 32-30 अशी मात करत हा सामना जिंकला आहे. बंगाल आणि मुंबा या दोन्ही संघांनी चांगल्या पकडी केल्या. या दोन्ही संघांनी पकडींमध्ये प्रत्येकी दहा गुणांची कमाई केली. चढायांमध्ये मात्र मुंबापेक्षा बंगालचा संघ वरचढ ठरला. बंगालने चढाईमध्ये 17, तर मुंबाने 13 गुणांची कमाई केली. दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा ऑल आऊट केले. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण मिळवले. पण मुंबाने बोनसच्या रुपात 3 आणि बंगालने 1 गुण मिळवला.