Home Cities जळगाव प.वि.पाटील विद्यालयाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

प.वि.पाटील विद्यालयाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगावचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. सदर समारंभामध्ये शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शालेय परीक्षा, वक्तृव, चित्रकला, रांगोळी, गीता पठण, सुंदर हस्ताक्षर, तसेच पालकांची पाककृती तसेच रांगोळी स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र रोख बक्षीसे तसेच स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून केसीई सोसायटीच्या संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रुपेश महाजन, मुख्या. प्रणिता झांबरे, किलबिल बालक मंदिराच्या मुख्या.अर्चना नेमाडे,  प्रतिभा नेहेते, शाळेच्या मुख्या.धनश्री फालक आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका कल्पना तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपशिक्षक सूर्यकांत पाटील यांनी मानले.


Protected Content

Play sound