जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तर “अंतरंग” या स्मरणिकेचे प्रकाशन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते झाले.
या महाविद्यालयात स्वयंम २ के २४ अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्याचप्रमाणे खो खो, व्हॉलीबॉल, कॅरम, क्रिकेट अशा विविध क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
शशिकांत वडोदकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वांनी जीवनाकडे बघण्याचा चांगला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. प्रेम, शिक्षण, माणुसकी अशी चार सूत्रे आत्मसात करण्याचे आवाहन वडोदकर यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी कॉलेजमधील विविध अभ्यासक्रम, वर्षभरातील विविध उपक्रम, कार्यक्रम, नवीन सभागृह आदीबाबत माहिती दिली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंटतर्फे विद्यार्थ्यांना मिळालेली नोकरी, कॉलेज न्यूज लेटर, प्रकाशित झालेले प्राध्यपकांचे रिसर्च पेपर व अंतरंग २ के २४ मॅगझीन अशा विविध प्रकारच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, ऍडमिनिस्ट्रॅटिव्ह डीन डॉ. श्रीकांत तारे, डॉ.अब्दुल कलाम कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा.संजय पावडे, पॉलिटेक्निक विभागाचे समन्वयक डॉ. सी. एस. पाटील, प्रा.सचिन नाथ, चेतन पाटील, अपूर्व वाणी आदी उपस्थित होते. विविध सत्रांचे सूत्रसंचालन पूर्वा नेवे, पूर्वा पाटील, रोशनी चिंचोले, स्नेहल चौधरी, यज्ञेश बारी यांनी केले. प्रा.अश्विनी पाटील यांनी आभार मानले.