Home राजकीय प्रियंका गांधी मोदींविरोधात वाराणसीतून लढवण्यास उत्सुक

प्रियंका गांधी मोदींविरोधात वाराणसीतून लढवण्यास उत्सुक


 

नवी दिल्ली (वृत्तसेवा) काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून निवडणूक लढवावी, अशी विनंती काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. यावर प्रियंका गांधी यांनी ‘वाराणसीतून निवडणूक का लढवू नये?’ असा प्रतिप्रश्न केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

प्रियंका गांधी यांनी गुरुवारी सोनिया गांधी यांचा मतदार संघ असलेल्या रायबरेलीत काँग्रेसचा प्रचार केला. रायबरेलीत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, आज माझ्या आईला वाईट वाटत होते. कारण ती तुम्हाला भेटायला रायबरेलीत येऊ शकली नाही. यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची विनंती केली. यावर प्रियंका गांधी हसत हसत म्हणाल्या, निवडणूक लढवायचीच असेल तर मग वाराणसीतून का नाही?. प्रियंका गांधी यांच्या या विधानाने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound