सोनभद्रला जातांना प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

priyanka gandhi

लखनऊ/वाराणसी (वृत्तसंस्था) सोनभद्र जिल्ह्यातील हत्याकांडातील वाराणसीत जाऊन जखमींची भेट घेतल्यानंतर सोनभद्रमध्ये घटनास्थळी जात असतानाच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

प्रियांका गांधी या शुक्रवारी सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटण्यासाठी जात होत्या. त्यावेळी पोलिसांनी नारायणपूर पोलीस ठाण्याजवळ त्यांचा वाहनताफा अडवला. याविरोधात प्रियांकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी प्रियांकांना ताब्यात घेतले.
दरम्यान ,आम्हाला केवळ पीडित कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे. माझ्यासोबत फक्त चार जण असतील असेही मी सांगितले. तरीही हे प्रशासन आम्हाला तिथे जाऊ देत नाही. आम्हाला का अडवले याचे उत्तर द्यायला हवे, असे प्रियांका म्हणाल्या.

 

Protected Content