जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील उमाळे गावाजवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या चालकाला खाजगी बसने धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत चालकाच्या दोन्ही पायाला दुखापत झाली असून एमआयडीसी पोलिसात खाजगी बसच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सोमवारी पांडुरंग निंबाजी बुचाले (वय ३१) रा. हरिविठ्ठल नगर हे त्यांचा (एम.एच.२५ बी. ९१०१) या क्रमाकांचा ट्रक घेवून जात असतांना तालुक्यातील उमाळ्याजवळ त्यांच्या ट्रकचे डिझेल संपले. त्यामुळे चालक बुचाले यांनी ट्रक रस्त्यालगत ट्रक उभा केला. व ट्रकजवळ उभे होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास औरंगाबाद कडून जळगावकडे येणार्या (एम.एच १९ वाय १११२) या खाजगी बसने उभे असलेले पांडुरंग बुचाले यांना धडक दिली. या अपघातात बुचाले यांच्या खांद्याला व दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी पाडुरंग बुचाळे यांनी मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन (एम.एच१९ वाय १११२) या क्रमाकांच्या खाजगी बसवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफार तडवी हे करीत आहेत.