नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय चलनाची स्थिती डॉलरच्या तुलनेत सुधारण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापण्याच्या बाजूने आपण आहोत,असे विधान भारतीय जनता पक्षाचे नेता आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला’विषयावर मंगळवारी रात्री मध्यप्रदेशच्या खंडवामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांचे भाषण झाले. यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी इंडोनेशियाच्या चलनावर भगवान गणेशाचे छायाचित्र असल्याचे सांगितले. त्यावर स्वामी म्हटले, या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात. परंतू माझे यासाठी समर्थन आहे. भगवान गणेश विघ्नहर्ता आहेत. मी तर असे म्हणेन की भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी आपल्या नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापले जावे. अगदी तसेच कोणालाही याबद्दल वाईट वाटू नये”, असे स्वामी म्हणाले.