नाशिक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपतर्फे नाशिकमध्ये आयोजित युवा संमेलनाच्या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. भाजपतर्फे नाशिकमध्ये युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून पंतप्रधान मोदी शक्तिप्रदर्शन करणार असून, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढविला जाणार आहे.
या मेळाव्यासाठी सुमारे दहा ते बारा हजार युवक उपस्थित राहण्याची शक्यता असून, राज्याचे भाजपचे सर्व मंत्री या सभेला उपस्थित राहतील. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेबरोबरच मंत्र्यांची सुरक्षाव्यवस्था, शहरातील वाहतूकव्यवस्था, तसेच सभेच्या ठिकाणी करावयाचे बंदोबस्ताचे नियोजन याचा या वेळी आढावा घेण्यात आला