मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 4:15 च्या सुमारास, नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग येथे पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील.
त्यानंतर पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग येथे ‘नौदल दिन 2023’ समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांच्या ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिकांचे’ पंतप्रधान साक्षीदार होतील.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली केंद्रासमोरील समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदल दिन साजरा होणार आहे. या निमित्ताने भारताच्या पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्री, अधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे या कार्यक्रमासाठी याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.