मंत्री अनिल पाटलांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटलांची उद्या जाहीर सभा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर सकल मराठा समाजतर्फे आयोजित मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा उद्या, दि. ३ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता साने गुरुजी विद्यालय येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेण्यात आली. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीची व्यवस्था सुव्यवस्थित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी वाहतुकीची रूपरेषा सांगितली.

चोपडा, पारोळा, व धरणगाव रोड करून येणार्‍यांची पार्किंग व्यवस्था विश्रामगृह व स्वामी समर्थ मंदिरामागे मोकळी जागेत व कचेरी जवळ करण्यात आली आहे. धुळे रोड करून येणार्‍या साठी पार्किंग व्यवस्था मार्केट कमिटी, सरजू शेठ यांची कॉम्प्लेक्स येथील जागा. मारवाड गलवाडे कडून येणार्‍यांसाठी पार्किंग व्यवस्था प्रमुख पेट्रोल पंपाजवळ, ग्लोबल शाळेजवळ करण्यात आली आहे. ढेकु रोड, पिंपळे रोड, कडून येणार्‍या साठी पार्किंग व्यवस्था नाट्यगृहासमोर करण्यात आली आहे. नांदगाव, तांबेपुरा कडून येणार्‍यांसाठी पार्किंग व्यवस्था खड्डाजीन इथे करण्यात आली आहे. या सभेसाठी येणार्‍यांना वाहन पार्किंगच्या ठिकाणी पार्क करावे लागेल. तसेच, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे लागेल असे याप्रसंगी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत पाटील व आभार संजय पाटील यांनी केले. यावेळी मनोहर पाटील, विक्रांत पाटील,संजय पाटील,जयवंतराव पाटील,राजेंद्र देशमुख, जयंत पाटील,हर्षल पाटील, प्रवीण देशमुख, जयेश पाटील,बाबू देशमुख आदी उपस्थित होते.

दरम्यान राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत असल्याने व मंत्री अनिल पाटील हे सत्तेत असल्याने जरांगे काय बोलतात याकडे संपूर्ण खान्देशाचे लक्ष लागून आहे.

Protected Content