पंतप्रधान मोदींवर ओढावली एका महिन्यात दुसऱ्यांदा आसाम दौरा रद्द करण्याची नामुष्की

modi 1

 

आसाम (वृत्तसंस्था) सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग दुसऱ्यांदा आपला प्रस्तावित आसाम दौरा रद्द करावा लागला आहे. नरेंद्र मोदी खेलो इंडिया यूथ गेम्सच्या उद्घाटनासाठी येणार होते. परंतू मोदी दौऱ्यावर आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, अशी धमकी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून देण्यात आली होती.

 

 

नरेंद्र मोदी खेलो इंडिया यूथ गेम्सच्या उद्घाटनासाठी प्रस्तावित दौरा होता. मात्र हा दौरा रद्द केल्यामुळे एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दौरा रद्द करण्याची नामुश्क्ती ओढवली आहे. राज्य सरकारकडून यासंबंधी निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी युथ गेम्सच्या उद्घाटनासाठी येणार नाहीत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. यावेळी मोदींना २२ जानेवारीला होणाऱ्या सांगता समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात येण्यासंबंधी चर्चा होणार आहे.

Protected Content