यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्याच्या प्राथमिक व माध्यमिक तसेच संस्था चालक शिक्षण महामंडळाचे संयुक्त विद्यमानाने धरणे आंदोलन येथील तहसील कार्यालया समोर २३ ऑक्टोबर सोमवार रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद शाळा दत्तक योजना खाजगीकरण विरोधात महाराष्ट्र माध्यमिक मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर संघ (फेडरेशन) व इतर सहयोगी संघटनानी राज्यात प्रभाविपणे प्रत्येक तालुका स्तरावर तहसील कार्यालया समोर “”धरणे आंदोलन””करण्याचा निर्णय घेतलेला आहे.तरी यावल तालुक्यात सदरील आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिनांक-२३ऑक्टोबर २०२३ वार-सोमवार रोजी सर्व माध्यमाच्या खाजगी, जि.प प्राथमिक,अनुदानित आश्रमशाळा,माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे.
सोमवारी २३ ऑक्टोबर २०२३ सोमवार रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत यावल तहसील कार्यालयासमोर यावल तालुक्यातील सर्व संस्थाचालक ,पदाधीकारी,माध्यमिक,उच्च माध्यमिक,जि.प.-खाजगी प्राथमिक,अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधु भगिनी यांनी आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन यावल तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघ व इतर सर्व जि. प.,खाजगी प्राथमिक, अनुदानित आश्रमशाळा विभागाच्या सहयोगी संघटना. तसेच संस्थाचालक,विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे आव्हान करण्यात आले आहे.
आंदोलना बाबतचे निवेदन यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम नगर पालिका यावल यांना देण्यात आलेले असुन निवेदनावर निवेदनावर मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जयंत चौधरी, मुख्याध्यापक व्हि.जी. तेली,माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष किरण झांबरे,माध्यमिक शिक्षक सचिव सुधीर चौधरी , प्रोटॉन संघटनेचे अध्यक्ष गणेश काकडे, उपाध्यक्ष तथा जळगाव माध्यमिक पतपेढीचे संचालक अजय पाटील, माध्यमिक पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे ,ज्ञानेश्वर देशमुख इत्यादींच्या निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.