मंदीरात पुजारीकडून महिलेचा विनयभंग

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मंदिरात पुजेसाठी गेलेल्या महिलेसोबत अश्‍लिल वर्तन करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील एका भागात राहणारी महिला त्यांच्या घराजवळ असलेल्या एका मंदिरात पुजेसाठी गेल्या होत्या. याठिकाणी पुजा करणारे महाराज त्या महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याने त्या महिलेने याबाबत तीच्या पतीला देखील सांगितले होते. दरम्यान सोमवारी दि. २ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ती महिला मंदिरात पुजा करण्यासाठी गेली असता, याठिकणी राम बालकदास महाराज हे त्या महिलेजवळ आले. त्यांनी महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन त्या महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार रामबालकदास महाराज यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content