Home Cities एरंडोल सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांचा गौरव

सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांचा गौरव

0
29

एरंडोल प्रतिनिधी । येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आज गौरव करण्यात आला.

येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दि.३ जानेवारी २०२२ रोजी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ऋषी किरण पाटील इयत्ता चौथी, दुसरा क्रमांक अनुजा प्रवीण पाटील इयत्ता तिसरी, तिसरा क्रमांक मानवी किशोर पाटील इयत्ता दुसरी या विद्यार्थिनींनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचा गौरव दि.२६ जानेवारी २०२२रोजी करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन व संचालिका मंगला महाजन यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र  देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन किशोर महाजन, एस.वि.माळी, बबलू मराठे पालक वर्ग, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound