अमळनेर प्रतिनिधी । खानदेशी अधिकारी यांचा मांडळ ग्रामस्थांकडून यूपीएससी व एमपीएससी परीक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा दि.3 नोव्हेंबर रोजी बाजार पेठ येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित केला होता.
यावेळी यूपीएससी परीक्षेत 182 रँक मिळवणारे गौरव साळुंके, 484 रँक मिळवणाऱ्या दृष्टी जैन व एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांच्यासह त्यांच्या पालकांचा सत्कार आमदार अनिल पाटील व शिंदखेडा चे माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच गौरव साळुंके यांचा सत्कार ग्रामपंचायत सरपंच विद्या पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते या वेळी करण्यात आला. तर मानसी पाटील यांचा सत्कार माजी सरपंच रंजना जितेंद्र पाटील यांच्या हस्ते झाला. ओडिशा राज्यात संबलपूरचे जिल्हाधिकारी मयूर सुर्यवंशी हे देखील डॉ.दीपक पाटील यांचे भाचे असल्याने त्यांच्या आईवडिलांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच गावातील सर्व क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्याचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर दीपक पाटील यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी मानसी पाटील म्हणाल्या की, मला शिक्षणाची प्रेरणा मांडळ येथील डॉक्टर सुनील चोरडिया यांच्यामुळेच मिळाली. मांडळ हे गाव कायम लोकांना सहकार्य करणारे गाव आहे. आमचे यश जरी छोटे असले तरी आमचे घाव मात्र कोणाला दिसत नाहीत तसेच चि.गौरव साळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, माझं आणि मांडळ चे नाते खुप जवळचे आहे. मंडळ हे गाव माझ्या मामाचे गाव आहे. मला वाचनाचे संस्कार माझ्या आईकडून मिळाले. यश हे सहज शक्य होत नाही. त्यासाठी खुप मेहनत करावी लागते. आयएएस होणे हे खूप मोठं नाही. परंतु समाजासाठी काही करायचे आहे यासाठी या परीक्षेत यावे असे आवाहन त्यांनी केले. शिंदखेडा चे माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात आमदार अनिल पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. मेहनतीशिवाय पर्याय नाही. पण स्पर्धा परीक्षा दिली होती. माझेही स्वप्न लाल दिव्याच्या गाडीचे आहे असे सांगून कु.गौरव साळुंके यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शामराव पाटील, डॉ.वाय. आर. सुर्यवंशी, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, जि.प. सदस्य संगीता भिल, लोणच्या सरपंच अंकिता पाटील, सरपंच नारायण कोळी, सरपंच डॉ. अशोक पाटील, सरपंच विनायक बडगुजर, रामदास जीवन कोळी, बाळासाहेब पवार, वसंत पाटील, नाना धनगर, जितेंद्र पाटील सह परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी चेअरमन मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बडगुजर सर व गंगासागर वानखेडे सर यांनी केले.