बुलडाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य शासनाच्या महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रमुख भूमिका आहे. या विभागाकडून कुटुंब नियोजन उपक्रमही राबविण्यात येत आहेत. मात्र, राज्य सरकारने कुटुंबासाठी समुपदेशन किटमध्ये रबरी लिंग उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरकारच्या निर्णयावर आशा वर्कर नाराज असून त्यांच्यासमोर एक विचित्र पेच निर्माण झाला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या खुलाशावर संताप केला आहे. त्यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
कुटुंब नियोजनासाठी आशा सेविका गावोगावी जाऊन महिलांचे समुपदेशन करतात. मात्र, राज्य सरकारकडून आशा सेविकांना देण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आले आहे. यामुळे आशा सेविकांसमोर मोठा पेच निर्माण झाला असून हे रबर लिंग किटमध्ये प्रात्यक्षिकासाठी देण्यात आले आहे. आशा सेविका त्या रबरी लिंग घेऊन गावोगावी कशा फिरू शकतात ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आरोग्य विभागाची कबुली, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा वर्कर्सना प्रात्यक्षिकासाठी रबरी लिंग देण्यात आले होते. मात्र, ते कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही. हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण भागातील महिलांसमोर आशा वर्कर्स यांनी कसे जायचे ? या वादात आशा वर्कर दिसत आहेत. यासंदर्भात आशा सेविकांशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी सरकारविरोधात बोलण्यास नकार दिला. मात्र सरकारच्या या अजब कारभारावर महिला संताप व्यक्त करत आहेत.
चित्रा वाघ यांनी सरकारवर केला हल्लाबोल
या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का..?’ अशी टीका केली आहे. आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले ३५/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट दररोज ओसरली असली तरी ती देण्यात आलेली नाही.