जलसंपदा विभागाच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सिद्धी डिडोळकर प्रथम

बुलडाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी जलसंपदा विभाग, बुलडाणा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘वॉटर रन दोन किलोमीटर’ 18 वर्षाखालील मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सिद्धी राजेश डिडोळकरने प्रथम पारितोषिक पटकावले आहे.

‘स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवा’ निमित्त ‘जलसंपदा विभाग, बुलडाणा’ यांच्या वतीने जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचाच एक भाग म्हणून रविवार, दिनांक 20 मार्च 2022 रोजी मुले आणि मुली त्यांच्या दोन दोन गटांमध्ये दोनच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

18 वर्षाखालील मुलींच्या गटांमध्ये तेजस्वी स्पोर्ट्स बुलडाणाची सिद्धी राजेश डिडोळकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला असून यावेळी तिला रोख रक्कम, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तिने आपल्या यशाचे श्रेय तेजस्वी स्पोर्ट्सचे क्रीडा प्रशिक्षक विजय वानखेडे, राजेश डिडोळकर यांना दिले.

Protected Content