ऋतुजा लटकेंच्या विरोधातील अर्ज मागे घेण्यासाठी दबाव : उमेदवारांचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या विरोधातील एका उमेदवाराने गंभीर आरोप केला आहे.

या प्रकरणी अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहीत आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप केला आहे. यातत्यांनी नमूद केले आहे की, मी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरलं होतं, मी अपक्ष उमेदवार आहे, छाननीअंती माझा अर्ज वैध असून माझ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या प्रतिनिधींनी मला भेटून माझ्यावर माघार घेण्यासाठी दबाव टाकला आहे. मी सध्या चिंताग्रस्त असून दडपणाखाली वावरत आहे. यांनी मला धमकी दिली आहे की माघार घेतली नाही तर तुला आणि तुझ्या परिवाराला आम्ही बघून घेऊ.
यात पुढे म्हटले आहे की, याशिवाय माझे आणि माझ्या परिवाराचे काही बरे वाईट झाल्यास या अर्जास उल्लेख असलेले सर्वजण त्याला जबाबदार असतील, असंही कांबळे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यांनी हे पत्र दिलं आहे.

 

 

 

Protected Content