Home राजकीय महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता


72010065

मुंबई (वृत्तसंस्था) सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

राज्यात सत्ता स्थापनेवरून दिवसभर चर्चेनंतर अखेर शिवसेनेचे नेते राजभवनात पोहचून​ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा केला पण, काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने त्यांच्या पाठींब्याचे पत्र सेनेला मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेलाही सत्ता स्थापन करता आली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही राज्यपालांना वेळ वाढून मागितली, परंतु त्यांनी वेळ दिली नाही. लवकरच पुढील भूमिका स्पष्ट करू, असे अदित्य म्हणाले.


Protected Content

Play sound