चिंचवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे.
अजित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. अलीकडच्या काळा या घटनेबाबत अनेकदा दावे-प्रतिदावे करण्यात येत असतांना आज शरद पवार यांनी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलतांना याबाबत पहिल्यांदा भाष्य केले आहे. ते म्हणाले की, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असा सवालही पवारांनी यावेळी केला. राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला.
छवार पुढे म्हणाले की, राजकारणात मतभेद असतात, संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. आता मी ही कॉंग्रेसमधून बाहेर पडलो. मात्र मी असं काही केलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. अशावेळी ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जनता जाते. सध्या मी राज्यात फिरतोय, त्यातून जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे दिसतंय. याचे परिणाम येणार्या निवडणुकांमध्ये दिसतील असेही शरद पवार म्हणाले.