२८ जून रोजी इराणमध्ये राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक

तेहरान-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा गेल्या महिन्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर २८ जून रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. शुक्रवारी होणारी निवडणूक अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. या वेळी राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत एकूण ६ उमदेवार स्पर्धेत आहेत. त्यापैकी ५ कट्टरपंथी आणि एक उमेदवार उदारमतवादी नेता आहे.

या निवडणुकीत पहिल्यांदाच पाश्चिमात्य देशांचे निर्बंध, प्रसार माध्यम स्वातंत्र्य, ब्रेन ड्रेन रोखण्यासारखे मुद्दे आहेत. सर्वात चकित करणारा निवडणुकीतील मुद्दा हिजाब कायद्याचा आहे. २०२२ मध्ये इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन आणि त्यानंतर सरकारने चालवलेल्या दडपशाहीमुळे अनेक मतदारांच्या मनात हा सर्वात मोठा मुद्दा राहिला आहे. हिजाब दीर्घावधीपासून धार्मिक ओळखीचे प्रतिक राहिला आहे. १९७९ मध्ये इस्लामी क्रांतीनंतर इराणमध्ये जेव्हापासून हिजाबचा कायदा झाला

Protected Content