Home Cities पाचोरा नगराध्यक्ष गोहील यांनी केले समस्येचे निराकरण

नगराध्यक्ष गोहील यांनी केले समस्येचे निराकरण

0
31
problem solved in pachora

problem solved in pachora

पाचोरा प्रतिनिधी । येथील भास्कर नगरातील नागरिकांसाठी नगराध्यक्ष संजय गोहील यांनी जलवाहिनी टाकून त्यांच्या समस्येचे निराकरण केले.

याबाबत वृत्त असे की, भडगाव रोडवरील महालपुरे मंगल कार्यालयच्या बाजूला असणार्‍या भास्कर नगरातील नागरिकांच्या नळातून दुषीत पाणी येत होते. पिण्याच्या चेंबरमध्ये नाल्याचे पाणी जात असल्यामुळे ही समस्या उदभवली होती. याची दखल घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील यांनी तातडीने अशोक बिल्डकॉमच्या अभियंत्यांना सांगून महामार्ग क्रॉस करून जलवाहिनी टाकली. यामुळे या भागातील नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्यात आले आहे. यावेळी मुकंद आण्णा बिल्दीकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे, सतिष चेडे, गंगाराम पाटील, आनंद पगारे, बापु हटकर यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound