जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहा दिवस मनोभावे पुजा केल्यानंतर आज बुधवारी २८ सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्तीमय वातावरण विसर्जन केले जाणार आहे. दहाव्या दिवशी अनंत चतुर्थीला जिल्ह्यातील १३६३ सार्वजनिक मंडळे, ५०४ खासगी तर १११ एक गाव एक गणपती मंडळांचे विसर्जन होणार आहे.
गणरायाचे विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांचा मोठ्या फौजफाटा तैनात करण्यात आला आला आहे. तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मिरवणुक मार्गस्थ होणार आहे, त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला ड्रोनची परवानगी देण्यात आली असून त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला जाणार आहे.
गणेशोत्सव निर्विघ्न व शांततेत पार पडावा यासाठी पोलिस दलाने दोन महिने अगोदरच तयारी केली. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी उपद्रवींवर कारवाई करुन त्यांच्या कडक कारवाई करण्यात आली आह.े दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पुजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाकडून विसर्जन मिरवणुक काढली जाणार आह.े दुपारी १२ वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार असून रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे. तसेच गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी ईद ए मिलाद निमित्त जिल्ह्यात ८८ ठिकाणी मिरवणुकी काढली जाणार आहे. या दोन्ही मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोेलीस दलाकडून पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, अमलदार (पुरुष), अमलदार (महिला), आरसीपी प्लाटून, स्ट्रायकींग फोर्स, क्युआरटी पथक असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.