फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्या येथे होत असलेला श्रीराम प्रभूंचा प्राणप्रतिष्ठा ऐतिहासिक सोहळा या ऐतिहासिक सोहळाचे साक्षीदार होण्यासाठी फैजपूर ऐतिहासिक नगरीमध्ये उद्या २२ रोजी सव्वा लाख दीपोत्सवचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
फैजपूर ही संतांची भूमी तसेच ऐतिहासिक नगरी म्हणून शहराची ओळख आहे. याच ऐतिहासिक नगरीत एक अभूतपुर्व अध्यायाची नोंद होणार आहे. श्रीराम प्रभू यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खंडेराव वाडी येथे दिनांक २२ रोजी सायंकाळी पाच वाजता सव्वा लाख दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन खंडेराव वाडी देवस्थान व शहरातील नागरिक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
खंडेराव वाडी येथे संपूर्ण सव्वा लाख दिवे लावण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी अनेक तरुण वर्ग गेल्या एक महिन्याभरापासून या कार्यक्रमाला लागले आहे. या सोहळ्यात तरूणाईचा विशेष उत्साह दिसून येत आहे. तब्बल पाचशे वर्षानंतर राम हे अयोध्या येथील मंदिरात विराजमान होणार असल्याने संपूर्ण फैजपूर नगरी ही भगवामय झाली आहे. ठिकठिकाणी झेंडे पताका रांगोळ्या काढून हा ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने शहरवासीय वाट बघत आहे.
या संदर्भात, खंडेराववाडी देवस्थानचे उत्तरधिकारी पवनदास जी यांनी सांगितले की, हा सोहळा जो होत आहे त्याचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही फैजपुर नगरी सव्वा लाख दिपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. या उत्साहात त प्रत्येक नागरिकांनी सहभाग व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.