रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बारावी परीक्षेसाठी रावेर तालुक्यातील शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली आहे. पाच परीक्षा केंद्रांवर या परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून सावदा, खिर्डी आणि चिनावल येथील केंद्रांचा समावेश आहे.
गटशिक्षणाधिकारी विलास कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक परीक्षा केंद्रावरील स्टाफ बदलण्यात आला आहे. शिवाय ड्रोन कॅमेरांच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रावर नजर ठेवली जाणार आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित वर्ग शिक्षक व केंद्रप्रमुखांवर कठोर कारवाई करण्याचे शासनाचे आदेश आहेत. शिक्षण विभागाच्या या कडक उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांसाठी योग्य वातावरण निर्माण होणार असून परीक्षांच्या पारदर्शकतेस प्राधान्य दिले जाणार आहे.