धरणगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत आज दि.7 सप्टेंबर रोजी गर्भवती महिलांना पोषण आहार मिळावा यासाठी अंगणवाडीच्या वतीने धान्यवाटप करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हनुमान नगर परीसरातील अंगणवाडी येथे आज गर्भवती महिलांना नगरसेविका संगिता मराठे यांच्याहस्ते कच्चे धान्य जसे गहू, दाळ, तेल, हळद, असे विविध कडधान्याचे प्रत्येकी माहिलेस १० पाकिटे देण्यात आली. तसेच सर्व महिलांची आरोग्य
तपासणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका संगिता मराठे, आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका किरण सोनार, तसेच अंगणवाडी सेविका वंदना कंखरे, मदतनीस कल्पना चव्हाण यांच्यासह परिसरातील सर्व गर्भवती महिला उपस्थितीत होत्या.