दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ३० जुलै मंगळवार रोजी केंद्र सरकारने प्रीती सूदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. १९८३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी प्रीती सूदन या माजी केंद्रीय आरोग्य सचिव आहेत. १ ऑगस्ट रोजी त्या पदभार स्वीकारतील.
प्रीती सूदन, आंध्र प्रदेश केडरचे अधिकारी आहे. त्यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव म्हणून काम केले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि आयुष्मान भारत मिशनमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते ओळखले जातात. याशिवाय नॅशनल मेडिकल कमिशन, अलाईड हेल्थ प्रोफेशनल कमिशन आणि ई-सिगारेटवर बंदी घालण्याचे श्रेयही त्यांना जाते.
तंबाखू नियंत्रणावरील फ्रेमवर्क कन्व्हेन्शनसाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या स्वतंत्र पॅनेलचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याव्यतिरिक्त, सूदन यांनी जागतिक बँकेसोबत सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रात एमफिल आणि सोशल पॉलिसी आणि प्लॅनिंगमध्ये एमएससी केले आहे.