जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फे घेण्यात येणारी राज्यसेवा पुर्व परिक्षा आज शहरातील १६ उपकेंद्रांवर घेण्यात आली. एकूण सहा हजार २६१ उमेदवारांपैकी तीन हजार ८६० उमेदवारांनी परीक्षा दिली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पुर्व परिक्षा १४ मार्च घेण्यात येणार होत्या. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला ही परिक्षा स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, परिक्षा स्थगित केल्यानंतर संतप्त विद्यार्थी व उमेदवारांनी कोर्ट चौकात आंदोलनही केले होते. त्यानुसार २१ मार्च रोजी परिक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होत. वेळापत्रकानुसार आज २१ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ तर दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान अशा दोन सत्रात शहरातील १६ उपकेंद्रात ह्या परिक्षा घेण्यात आल्यात . पहिल्या सत्रात ६ हजार २६१ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ८६० विद्यार्थी हजर होते तर २ हजार ४०१ विद्यार्थी गैरहजर होते. दुसऱ्या सत्रात ६ हजार २६१ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ८३३ विद्याथी हजर होते तर २ हजार ४२८ विद्यार्थी गैरहजर होते.
परिक्षा सुरू होण्यापुर्वी परीक्षा केंद्रावर उमेदवारांना सुरक्षा किट देण्यात आले. यात मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज देवून आत सोडण्यात येत होते. सोबतच शरीराचे तापमान मोजण्यात येवून सॅनिटायईज करून आत सोडले जात हाते. परिक्षा हॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेसाठी ४८९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
jalgaon taluka news, jalgaon city news, jalgaon live news, jalgaon live, jalgaon news, jalgaon update news,