Home Cities यावल बालसंस्कार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे सुयश

बालसंस्कार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे सुयश

0
35

WhatsApp Image 2019 05 21 at 8.37.40 PM

यावल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत यंदा घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमीक शिष्यवृत्ती परिक्षेत येथील बाल संस्कार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.

इयत्ता ५ वीमधील विद्यार्थीनी तेजश्री जितेन्द्र सोनवणे हिने (२३६ गुण) प्रथम तर विद्यार्थी सिद्धेश गोवींद वाणी याने (२२४ गुण) द्वितीय क्रमांकावर राहुन गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदवले आहे.या दोघा विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशामुळे बालसंस्कार विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी, सर्व संस्था संचालक, शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा वाणी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound