मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील चांगदेव येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठा यात्रोत्सव भरत असतो. यावर्षी मार्च महिन्यात महाशिवरात्री आहे. अद्याप शासनाकडून यात्रोत्सव भरवण्यासंदर्भात स्पष्ट सूचना नसल्या तरी पोलीस प्रशासनाकडून पूर्व तयारी असावी या हेतूने श्री क्षेत्र चांगदेव मंदीर परिसराची पाहाणी केली.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पीएसआय नीलेश सोलुंके, नवनिर्वाचीत सरपंच निखिल बोदडे, पुजारी विष्णु महाराज, भूषण चौधरी, पोकॉ गणेश चौधरी, पोकॉ गणेश मनुरे आदी उपस्थीत होते.