मुंबई- पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांची ईडीने ७२ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.
ईडीने पीएमसी बँक घोटाळ्यात मनी लाऊण्डरिंग प्रकरणी प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आधी या प्रकरणामध्ये ईडीने प्रवीण राऊत यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांच्याकडे कोटींची संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला. हा पीएमसी बँक कर्ज प्रक्रियेत घोटाळा करून मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत ही संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावला होता. त्यांना २९ डिसेंबर रोजी ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयामध्ये हजर होण्याचे सांगितले होते. मात्र, संजय राऊत यांनी ईडीकडे यासाठी मुदत मागितली होती. त्यानुसार वर्षा राऊत यांना दुसरे नवे समन्स ईडीने पाठवले असून ५ जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे.