यावल प्रतिनिधी । येथील गणेश नगरातील रहीवाशी व तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयाचे शिक्षक प्रशांत अरूणराव भोईटे (वय 52) यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजेचे सुमारास सामुहीक प्रार्थणा झाल्यांनतर भोईटे यांना दमदरून घाम आला. उपचारापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. भोईटे आणि विद्यार्थ्यांचे अत्यंत जिव्हाळयाचे सबंध होते. ते सर्व विध्यार्थ्यांचे आवडते सर म्हणून विद्यालयात प्रसीध्द होते या घटनेने शाळेसह किनगाव बुद्रुक व खुर्द गावात शोककळा पसरली. रूग्णालयात पं.स. उपसभापती उमाकांत रामराव पाटील येथील नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक वृंद, नातेवाईक, किनगाव ग्रामस्थांनी मोठी गर्दी रुग्णालयात उपस्थित होते. त्यांच्या पश्चात कुटुंबात वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परीवार आहे.