अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मुस्लिम समाज व पैलाड खारोट कब्रिस्तान ट्रस्टच्या वतीने श्री संत सखाराम महाराज यांच्या वाडी संस्थानचे गादीपती प. पु. संत प्रसाद महाराज यांचा आज (दि.१५) जाहीर सत्कार अली इसलाई फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी कमर अली शहा यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील पैलाड खारोट मुस्लिम कब्रिस्तान हे बोरी नदीला लागुन आहे. सदरील मुस्लिम कब्रिस्तान शेकडो वर्ष जुने आहे, या कब्रिस्तानच्या समोर श्री संत सखाराम महाराज यांची समाधी आहे. प्रति पंढरपूर म्हणून याची ओळख आहे. अनेक दिवसांपासुन पैलाड मुस्लिम कब्रिस्तान ट्रस्ट व संत सखाराम महाराज ट्रस्ट सदरील जागेचा दावा करत होते परंतु वाडी संस्थानचे गादीपती प. पु. संत प्रसाद महाराज यांनी पुर्णपणे कागदपत्रांचे अभ्यास केला व सत्कार समारंभात जाहीर केले की, सदरील जागा मुस्लिम समुदायाची दफन विधीचीच आहे. आपण आपल्या जागेवर कम्पाउंड करण्यास काही हरकत नाही. इतर जे काही अतिक्रमण आहे ते ही लवकरात लवकर स्थालंतर करण्यात येईल, असे दिलखुलासपणे सांगितले. अश्याचप्रकारे हिंदू मुस्लीम एकमताने राहावे, अशी प्रार्थना याप्रसंगी केली. खारोट मुस्लिम कब्रिस्तान ट्रस्ट व शहर मुस्लिम समुदायाचे वतीने सदरील जागेवरच वाडी संस्थानचे गादीपती प. पु. संत प्रसाद महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांच सत्कार करण्यात आला. यावेळी पैलाड खारोट मुस्लिम कब्रिस्तानचे ट्रस्टी फरीद जब्बारखा पठान, हाजी नसीरुद्दीन शेख, हाजी कादर जनाब दबिर पठाण, नगरसेवक सलीम टोपी, मसुदखा मिस्तरी, अँड रज्जाक शेख, शिवसेनेचे नगरसेवक संजय भिल, सामाजिक कार्यकर्ते संतोष लोहरे, माजी नगरसेवक फिरोज मिस्तरी, आसिफ भैय्या, हाशम अली, सैय्यद ताहेर, शेख इकबाल, खासाहब शराफत अली, अकबर शहा, मुकतार मिस्तरी, मुबीनोदीन शेख, जाकिर मेवाती, यांच्यासह शेकडोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शेरो शायेरीच्या अंदाजात मोहम्मद रियाज शेख यांनी केले.