Home क्राईम सराफ व्यापारी प्रमोद वर्मा यांचा रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू

सराफ व्यापारी प्रमोद वर्मा यांचा रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू


1c82ae89 2d6d 481c 9afd 5c64477ddd47
 

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील सराफ बाजारातील चेतन ज्वेलर्सचे संचालक सुनील वर्मा यांचे लहान बंधू व सराफ व्यापारी प्रमोद वर्मा (वय ४०) यांचे आज सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास नांदगाव ते न्यायडोंगरी दरम्यान अपघाती मृत्यु झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, आज सकाळी महानगरी एक्स्प्रेसने मनमाड येथे काही कामानिमित्त प्रमोद वर्मा हे गेले होते. काम आटपून चाळीसगावकडे काशी एक्सप्रेसने येत असताना नांदगाव ते न्यायडोंगरीदरम्यान त्यांना मोबाईलवर कॉल आला. वर्मा यांनी तो फोन उचलला तेव्हा ते दरवाज्याजवळ उभे होते. फोनवर बोलत असतांना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते धावत्या रेल्वेतून खाली पडले. या घटनेचे प्रत्यक्षदर्शनी चाळीसगाव सराफ बाजारातील कारागीर बद्री कढेल यांनी ही हकीगत सांगितली. नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला असून आज रात्री ९ वाजता चाळीसगाव येथील टिळक चौक येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. प्रमोद वर्मा हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या मृत्यूची बातमी सोशेल मेडियावर पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. सर्व सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली आहेत. मयत प्रमोद वर्मा यांच्या पश्चात २ मुली पत्नी आई व भाऊ असा परिवार आहे. ते सराफ व्यापारी सुनील वर्मा यांचे लहान भाऊ होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound