Home Cities चाळीसगाव लोकसभेसाठी प्रमोद पाटील यांचे संपर्क अभियान सुरु

लोकसभेसाठी प्रमोद पाटील यांचे संपर्क अभियान सुरु


जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीसगाव तालुका संस्थापक अध्यक्ष व जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पांडुरंग पाटील यांनी जळगाव मतदार संघातून पक्षातर्फे लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मतदार संघात तालुक्यांमध्ये संपर्क अभियान सुरु केले आहे.

प्रमोद पाटील यांनी नुकताच त्यांनी चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा या तालुक्यांचा दौरा पूर्ण केला असून यानंतर ते धरणगाव व जळगाव तालुक्यात जाणार आहेत. आपण उमेदवारीसाठी इच्छुक असलो तरी पक्षाने दुसर्या कुणाला उमेदवारी दिल्यास आपण त्याला संपूर्ण सहकार्य करू असे पाटील यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना म्हटले आहे.

खालील व्हिडिओ मध्ये पहा प्रमोद पाटील यांचे मनोगत


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound