जळगाव प्रतिनिधी । काँग्रेस-राष्ट्रवादीकडे राज्यात आता ताकदच उरलेली नाही, काँग्रेसने तर सांगलीच्या कार्यालयाला कुलूप लावले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाच मत्सर संघ वंचित आघाडीसाठी खूपच अनुकूल झाले आहेत. असे स्पष्ट प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत केले.
आजच्या पत्रकार परिषेदत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गांधी वादी लोक आता काँग्रेस सोडून बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण त्यांना काँग्रेस आता कुठे लढताना अथवा प्रतिकार करताना दिसतच नाही. शरद पवारांनीही माढातून माघार घेतल्याने आता आमची थेट लढत भाजपा उमेदवाराशी होणार आहे. माढा मतदार संघात करण्यात आलेल्या एका खाजगी सर्वेक्षणातून वंचित आघाडीचे उमेदवार विजय मोरे यांना सुमारे ५० टक्के पाठींबा असल्याचे उघड झाल्याने व तो तोडणे अशक्य असल्यानेच त्यांनी माघार घेतली आहे, असेही ते म्हणाले. विदर्भाबद्दल ते म्हणाले की, भंडारा-गोंदियात काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही, नागपूरच्या उमेदवाराला लोकांनीच डमी ठरवले आहे. चंद्रपूरला तर उमेदवारच मिळालेला नाही, त्यामुळे आज तरी आम्हाला विदर्भातले वातावरण वंचित आघाडीसाठी फेवरेबल वाटतेय, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पहा : प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ.