मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील “प.पू गुरु वर्य संत रामभाऊ पुजारी बाबा सेवा भावी ट्रस्ट अंतर्गत “राम रोटी आश्रम” चे मुस्लिम मनियार बिरादरीच्या वतीने आश्रम वर जाऊन त्यांचे गौरव करण्यात आले.
या बाबत सविस्तर वृत की “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” ही सेवाभावी कृती अंगीकारुन मागील 17 वर्षापासुन निस्वार्थ पणे समाजीक, धार्मिक, आरोग्य व संत महापुरुषाचे जयंती साजरी करण्याचे कार्य या संस्थे द्वारे चालु आहेत.
त्यात प्रमुख्याने 1) आठवडे बाजारात येणाऱ्या अंध दिव्यांग,भिकारी,साधु,फकीर निराधार लोकांना दर रविवारी अन्नदान करणे 2) दर महिन्याला एकादशीनिमित्त फराळ वाटप करणे 3) दर वर्षी दोन अनाथ बालकांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षित करणे 4) बेवारस मतिमंद गरिब गरजुना ब्लँकेट वाटप करणे 5) उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी मातीचे भांडे उपलब्ध करुन वाटप करणे 6) गावोगावी सामुहिक वृक्ष रोपण करणे 7)र क्तदान शिबीर घेणे.8) दर वर्षी 101 गरीब कुटुंबाला दिवाळीचे किराणा उपलब्ध करुन देणे 9) संत महापुरुषाचे जयंती साजरी करणे, या सर्व कामा समाजाचे दिन दुबले गरीब लोकांसाठीचे कार्याचे गौरव म्हणून मुक्ताईनगर तालुका मुस्लिम मनियार बिरादरी द्वारे मुक्ताईनगर येथील राम रोटी आश्रम यांना सन 2024 चा सामाजिक क्षेत्रात केलेले योगदानाबद्दल तालुका स्तरीय भारत रत्न मौलाना आझाद पुरुस्कार सन 2024 या सन्मानाने गौरव करण्यात आले.
हा पुरस्कार मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकिम आर चौधरी,मनियार मस्जिद चे मुतवल्ली कलीम मनियार, सदस्य रफिक हाजी मजीद, आसीफ पेन्टर, जेष्ठ मार्गदर्शक हाजी उखर्डु महेमुद,एच.डी.एफ सी बॅक चे केशीयर हसन सैय्यद, मराठा वसतिगृह चे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश जी कदम,यांचे हस्ते रामरोटी आश्रम चे अध्यक्ष किशोर गंवाडे बापु साहेब, रामभाऊ टोंगे,सचिव रघुनाथ पाटील, उमेश पटेल सर ,किरण महाजन, नामदेव काटे,सुभाष माळी, दिनकर मोरे,नाना बडगुजर, यांना देण्यात आला,सदर कार्यक्रमा मध्ये प्रमोद गावंडे, सुभाष सोनवणे,अशोक कोळी, गोपाळराव महाजन, प्रदीप चौधरी,के.डी पाटील,राजेश पाटील सर,प्रदीप सोनार,अदि मोठ्या संख्येत उपस्थित होते.