Home Cities जामनेर प्रफुल्ल लोढा यांचा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

प्रफुल्ल लोढा यांचा देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील आरोग्यदूत आणि सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्लभाऊ लोढा यांनी अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोढा यांच्या या घरवापसीमुळे तालुक्यात भाजपा पक्षाला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रफुल्ल लोढा यांचा सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा अनुभव असून, त्यांनी आरोग्यदूत म्हणून जनतेमध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाचे स्थान जामनेरमध्ये अधिक मजबूत होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोढा यांचे स्वागत करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि तालुक्यातील भाजपाच्या लोककल्याणकारी कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याबाबत विश्वास व्यक्त केला.

प्रफुल्लभाऊ लोढा यांनी भाजपा पक्षात प्रवेश करताना सांगितले की, भाजपाचे विचार आणि विकासकार्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. तालुक्याच्या विकासासाठी मला भाजपा व्यासपीठातून काम करण्याची संधी मिळत आहे अशी प्रत्येक या पक्षप्रवेश करताना प्रफुल लोढा यांनी दिली आहे


Protected Content

Play sound