चोपडा, प्रतिनिधी | जिल्हा परिषदचे समाज कल्याण विभागाचे अध्यक्ष व चोपडा विधानसभा मतदार संघातले अपक्ष उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी मतदार संघात प्रचाराचा धडाका लावला असून आतापर्यंत १५१ गावांना प्रत्यक्षात भेट दिली आहे. आज (दि.१९) शेवटच्या दिवशीही त्यांनी चोपडा शहर, नागलवाडी, वराड, बोरअंजटी या गावातून प्रचार फेरी काढली होती.
प्रभाकर आप्पा हे राजकारणचा, समाजकारणचा, विकासाचा महामेरू आहेत. त्यांचे बंधू स्व. भिलाभाऊ सोनवणे यांनी अनेक विकासकामे करून तालुक्यातील जनतेवर प्रेम व्यक्त केले आहे. आप्पा हे स्वत: शांत, कर्तृत्ववान, मनमिळाऊ, उच्चशिक्षित, कार्यसम्राट, दूरदृष्टी असणारे उमेदवार आहेत. अशा भावना ग्रामस्थ ठिकठिकाणी व्यक्त करीत आहेत. प्रभाकर आप्पा अपक्ष उमेदवार असल्याने अनेक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते येऊन त्यांची भेट घेऊन पाठींबा दर्शवत आहेत.
प्रभाकर आप्पा यांच्या विजयासाठी चोपड्याचे माजी आमदार कैलास बापू पाटील, भाजपाचे चंद्रशेखर युवराज पाटील, भाजपाचे मुलुख मैदान तोफ शांताराम आबा पाटील, भाजपाचे आत्माराम म्हाळके, शेतकी संघाचे माजी चेअरमन हिम्मतसिंग पाटील ,माजी जि.प.सदस्य शांताराम सपकाळे, शिवसेनेच्या नेत्या सौ इंदिराताई पाटील, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद पाटील, माजी पंचायत सभापती रमेश महाजन, भाजपाचे प्रदीप पाटील, डी.पी. साळूंखे, प्रकाश रजाळे, माजी पंचायत समितीचे उपसभापती मुरलीधर बाविस्कर, सीताराम गोबा देवराज, भाजपाचे जे.के.थोरात ,सुनील पाटील, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, सुनील शर्मा, अनिल शर्मा, मनीष पारीख, तुषार पाठक, प्रल्हाद पाटील, सुनील सोनगिरे, सौ.कल्पना कोळी, रवी मराठे, पप्पु पाटील, विष्णु पाटील, देवा बापू पाटील, हनुमंत पाटील, लक्ष्मण पाटील, रमाकांत बोरसे, डॉ. राहुल पाटील, गोपाल भाट, देवेंद्र सोनवणे, डॉ. पांडुरंग सोनवणे, डॉ. आशिष पाटील, नरेंद्र पाटील, भागवत पाटील, सुनील पाटील, भारती शिरसाठ, सुनंदा पाटील, भिवराज रायसिंगे, रोहिदास अहिरे, राधेश्याम गवळी, रामचंद्र भादले, योगेश पाटील, धर्मदास पाटील, अविनाश धनगर, अशोक बेलदार, अमोल पाटील, गणेश पाटील, गोपाल कुंभार, राकेश बेलदार, किरण पाटील, (नागलवाडी) राजेन्द्र चौधरी, विशाल गवळी, दिलीप गवळी, योगेश भोसले, अशोक पाटील, माणिक कोळी,सुकलाल कोळी, रवींद्र बिऱ्हाडे, अंबादास कोळी, भुरा भिल (वराड), आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार प्रयत्न करीत आहेत.