चोपडा, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांच्या गटाची साथ मिळाली असून तालुक्यातील गावागावातून मतदारांच्या घरोघर जावून प्रभाकर आप्पा त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष पोहोचले आहेत. प्रचारादरम्यान ते वडीलधाऱ्या मतदारांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत.
त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी स्वतंत्रपणे मतदारांच्या भेटी-गाठी घेऊन प्रभाकर आप्पा यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या सोबत चंद्रशेखर युवराज पाटील, मुलुख मैदान तोफ शांताराम पाटील, आत्माराम म्हाळके, शेतकी संघाचे माजी चेअरमन हिम्मतसिंग पाटील, माजी जि.प.सदस्य शांताराम सपकाळे, शिवसेनेच्या नेत्या सौ इंदिराताई पाटील, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, शेतकी संघाचे व्हा. चेअरमन प्रल्हाद पाटील, माजी पंचायत सभापती रमेश महाजन, भाजपाचे प्रदीप पाटील, डी.पी. साळूखे, माजी पं.स. उपसभापती मुरलीधर बाविस्कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर पाटील, सीताराम देवराज, भाजपाचे जे.के.थोरात, सुनील पाटील, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, प्रकाश रजाळे, सुनील शर्मा, अनिल शर्मा, मनीष पारीख, तुषार पाठक, प्रल्हाद पाटील, सुनील सोनागिरे, सौ. कल्पना कोळी, रवी मराठे, पप्पु पाटील, विष्णु पाटील, लक्ष्मण पाटील, रमाकांत बोरसे, डॉ. राहुल पाटील, गोपाल भाट, देवेंद्र सोनवणे, डॉ. आशिष पाटील, नरेंद्र पाटील, भागवत पाटील, सुनील पाटील, भारती शिरसाठ, सुनंदा पाटील, भिवराज रायसिंगे, रोहिदास अहिरे, राधेश्याम गवळी, रामचंद्र भादले यांच्यासह शेकडो पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करत आहेत.