चोपडा, प्रतिनिधी | अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांचा मतदारसंघात हायटेक प्रचार सुरू असून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रभाकर सोनवणेंचा गावागावात ढोल ताश्याच्या गजरात व आतिषबाजीसह जल्लोषात स्वागत होत आहे.
नियोजनबद्धरीतीने प्रभाकर सोनवणे यांनी प्रचारास वेग दिला आहे. हायटेक प्रचार, आयाबहिणीने औक्षण करत आबालवृद्धाचे आशीर्वाद घेत सोनवण यांचा कोळंन्हावी, डाभुर्णी, डोनगाव, उटावद , चिंचोली परिसरात प्रचार जोरात सुरू आहे. अनेक गावांमध्ये प्रभाकर सोनवणेंना मतदार स्व.भिलाभाऊ सोनावणेची आठवण करून देत आहेत. स्व. भिलाभाऊ आमचे सर्व काम करायचे त्यांचा आमच्यावर अनेक उपकार आहे. त्या उपकारांची परातफेड करण्यासाठी ह्यावेळेस संधी मिळाली आहे त्या संधीचे सोन आपणांस मतदान करून आम्ही करू असे अनेक गावातील लोकांनी सांगितले. यावेळी चोपड्याचे माजी आमदार कैलास बापू पाटील, माजी जि. प. सदस्य शांताराम सपकाळे , ए. डी. चौधरी, तुकाराम पाटील, प्रकाश रजाळे, सुभाष पाटील, देवेंद्र सोनवणे, गजेंद्र सोनवणे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत अरुण वाघ, रविंद्र पाटील, संजय पाटील, टिकाराम चौधरी, कैलास कोळी, हिरालाल साळुंखे, सुनंदा पाटील उपस्थित होते. तसेच मनोहर पाटील, जानिकिराम बाविस्कर, भिवराज रायसिंगे, रोहिदास अहिरे, वामन सोनवणे, अण्णा सोळूखे, पद्माकर सोळंके, आण्णा सपकाळे, गौरव सोळंके, सचिन सोळंके, बापू सोळंके सहभागी झाले होते. बाळू सोनवणे, राहुल सोनवणे, ईश्वर सोळंके, पूर्वजीत चौधरी, समाधान कोळी, विजय कोळी, जीतेंद्र कोळी, हिरामण कोळी, विनोद कोळी, गोकुळ कोळी, वसंत फालक, यशवंत चौधरी, मुरलीधर कोळी, सुनील कोळी, दिनेश पवार, युवराज कोळी, सचिन कोळी, अरुण पाटील, संजय पाटील, बळीराम पाटील, बाबुलाल पाटील, वाल्मिक पाटील, भानुदास पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल सोळंके, रमेश कोळी, सचिन कोळी, पवन म्हस्के, शुभम धनगर, समाधान पाटील, विजय पाटील आदी शेकडो कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.