Home Cities जळगाव प्रा. किसनराव झिपरे यांचा डॉक्टरेटबद्दल सत्कार !

प्रा. किसनराव झिपरे यांचा डॉक्टरेटबद्दल सत्कार !


1f5e1349 6bbe 434d ac64 412eda6287a3

जळगाव (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील प्रा. किसनराव झिपरे यांनी नुकतीच अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी. करून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे.त्यांनी मिळविलेल्या या यशा बद्दल गवळी समाजाने त्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला आहे.

 

प्रा. झिपरे हे कामानिमित्त त्यांचे व्याही व बहिणाबाई विद्यापीठात कार्यरत असलेले प्रकाश लंगोटे यांच्याकडे आले असता महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या येथील जिल्हा शाखेतर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष, दिलीप यमगवळी, युवा तालुका अध्यक्ष संतोष जानगवळी, युवा उपाध्यक्ष अनिल उदिकर, युवा सचिव दिपक जोमिवाळे व संपर्क प्रमुख कृष्णा गटरी व प्रकाश लंगोटे आणि चाळीसगाव येथील योगेश निस्ताने, भावेश यमगवळी आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound