मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महावितरणतर्फे आज महत्वाचे आणि मोठे काम करण्यात येणार असल्याने सकाळपासून किमान पाच तासांसाठी वीज राहणार नसल्याचे महावितरणतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
वादळाने अचानक वीज पुरवठा करणारे टावर कोसळल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील व शहरातील पुरवठा खंडित झाला होता सदर वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी तब्बल दोन दिवसाचा कालावधी लागणार होता. यामुळे तालुक्यातील शेती तसेच आरोग्याच्या सेवा विस्कळीत झाले असते. परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने वीज वितरण कंपनी तर्फे जोखीम स्वीकारून अवघ्या सहा तासात पूर्ववत वीज पुरवठा करण्यात आला. दरम्यान, आज सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत या दुरुस्तीचे काम चालणार आहे त्यामुळे या कालावधीत वीज पुरवठा खंडित राहणार असून जनतेने सहकार्य करावे असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, अतिशय जोखीम पत्करून वीज वितरण व वीज पारेषण कंपनीच्या अधिकारी कर्मचार्यांनी वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांनी वीज पारेषण अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. पथकात वीज वितरण चे मुख्य अभियंता कैलास हुमणे, वीज वितरणचे अधीक्षक अनिल महाजन, महापारेषणचे मुख्य अभियंता संजय भोळे, अधीक्षक विलास खासणे, वितरणचे कार्यकारी अभियंता ब्रिजेश कुमार गुप्ता, महापारेषणचे अधीक्षक अभियंता अनिल भारसाकडे, पारेषण चे कार्यकारी अभियंता विनोद लोखंडे, उपकार्यकारी अभियंता तसेच ज्युनिअर इंजिनियर तसेच कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.