जळगाव प्रतिनिधी। धरणगाव मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात धरणगाव येथील महिलांना 8 मार्च पासून आमरण उपोषणास बसलेले आहे. आज पाचवा दिवस आल्यानंतर जिल्हा प्रशासनकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्यां महिलांना आत्मदहन करण्याचा प्रयत्न आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास झाला. यावेळी जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सिमा भोळे यांनी चर्चा करून प्रकल्पाधिकारी यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी यांचा निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले. यावेळी महापौर भोळे यांच्याहस्ते लिंबूपाणी घेवून उपोषण स्थगित केले.
धरणगाव मुख्याधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी
धरणगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या मनमानी कारभार व आलेले उपोषणकर्त्यां नयना चौधरी यांनी धरणगाव नगरपालिकेत गट नं. 1577 ही शेतजमीन शेत एन.ए. करण्यासाठी गेल्या सप्टेंबर 2018 पासून दाखल केलेल्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत संबंधितांना शिवीगाळ करून कार्यालयाबाहेर हाकलून लावणे असे प्रकार थांबावावे, धरणगाव नगरपालिकेच्या महिला मुख्याधिकारी यांची चौकशी करून निलंबित करावे अशी मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणगाव येथील महिलांनी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.
जिल्हा पेठ पोलीसांची धावपळ
उपोषणकर्त्यां महिला नयना दिपक चौधरी, वर्षा मनोज झोपे, देवयानी प्रविण महाजन, भारती सुधीर नारखेडे, शितल योगेश साळुंखे, मनोज छगन झोपे, प्रविण महाजन, दिपक बळीराम चौधरी, आणि चंद्रशेखर अत्तरदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेलची कॅन घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असतांना उपस्थित असलेल्या महिला पोलीसांना रोखून घेतले. याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सोनवणे यांना माहिती मिळताचे घटनास्थळी धाव घेतली. वेळीच पोलीसांची हस्तक्षेप केल्यानंतर घटना टळली.
उपोषणाला स्थगिती
धरणगाव मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला असून तसेच शासनाकडे दाखल असलेला गट नं. 1577 गटाचा एन.ए. मंजूरीला निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकल्प अधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या आश्वासनानंतर जळगाव मनपाचे महापौर सिमा भोळे यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली.