दिवाळीपूर्वी वेतन देण्याच्या निर्णयाला स्थगिती ; कर्मचाऱ्यांचा पूर्णत: हिरमोड

employee diwali

मुंबई प्रतिनिधी । दिवाळीपूर्वी राज्य शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार व निवृत्तीवेतन देण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. आता दिवाळीपूर्वी पगार होणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यामुळे कोषागारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पूर्णत: हिरमोड झाला आहे.

दिवाळी सणाचे महत्त्व लक्षात घेता सर्व कर्मचा-यांचे माहे ऑक्टोबर माहिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अर्थात 24 तारखेपूर्वी करण्यात यावे याबाबतचा आदेश शासनाच्या वित्त विभागाने 9 ऑक्टोबरला निर्गमित करण्यात आला होता. परंतू अवघे दोन दिवस उलटत नाहीत तोच वित्त विभागाने या आदेशाला स्थगिती दिली आहे. आता दिवाळीपूर्वी पगार होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यामूळे कर्मचा-यांचा पूर्णत: हिरमोड झाला आहे. दरमान्य, विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी कोषागारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. मनुष्यबळाअभावी वेतन आणि निवृत्ती वेतन २४ ऑक्टोबरपूर्वी देता येणार नसल्याबाबतचे परिपत्रक लेखा व कोषागार विभागाचे संचालक ज.र.मेनन यांनी काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content