Home अर्थ २८ जूनला होणार ‘डाक पेन्शन अदालत’

२८ जूनला होणार ‘डाक पेन्शन अदालत’

0
29

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पांडे चौकातील डाक विभागातर्फे डाक अधीक्षक कार्यालयात २८ जून रोजी दुपारी चार वाजता पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डाक अधिक्षक यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेन्शन अदालत मध्ये दाखल घेतली जाईल. यामध्ये टपाल विभागातून निवृत्त झालेल्या अथवा सेवेत असतांना मृत्यू झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा विचार करण्यात येईल. पेन्शन अदालत मध्ये वैयक्तिक कायदेशीर प्रकरणे जसे वारस इ. तसेच नाती आधारित सूचना अथवा तक्रारी यांचा विचार केला जाणार नाही, यांची सर्वांनी नोंद घ्यावी, अधिक माहितीसाठी पांडे चौकातील डाकघर अधिक्षक यांनी शुक्रवारी १७ जून रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

 


Protected Content

Play sound