जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर सोशल मीडियावर टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे संशयित आरोपी सुनिल भगवान वाडीले या याने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट टाकून आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा प्रकार गुरूवार २९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता समोर आला. हा प्रकार समोर आल्यानंतर विशिष्ट समाजातील एका तरूणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्या तक्रारीवरून शनिवारी २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुनिल भगवान वाडिले याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील हे करीत आहे.