मुंबई । राज्यातील सद्यस्थितीतली राजकीय स्थिती लक्षात घेतली असता मध्यावधी निवडणुकीची शक्यता असल्याचा दावा आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्यासाठी बोलणी सुरु झाल्याचं म्हटलं जातं. युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच या दोन्ही नेत्यांची तब्बल २ तास भेट झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
यातच राज्यात सध्या मध्यावधी निवडणुकीसारखी परिस्थिती आहे, मध्यावधी निवडणुका कुठल्याही पक्षाला नको, एक निवडणूक लढणं, पक्षाला आणि उमेदवाराही अवघड असतं, अनिश्चितता राहते, शेवटी कोणाची तडजोड झाली नाही तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. आगामी निवडणूक भाजपा स्वबळावर लढवेल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.