राज्यमंत्री बच्चू कडू यांना अटकपूर्व जामीन मंजूर

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रस्ता कामातील अपहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात राज्यमंत्री बच्चू कडू यांना आज अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकरांनी यासंदर्भात बच्चू कडूंविरोधात अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत १ कोटी ९५ लाखांच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप केला होता. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात राज्यपालांकडेही कारवाईसाठी परवानगी मागितली होती.

न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले होते. त्यावर न्यायालयाच्या आदेशाने अकोला शहरातल्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कलम १५६/३ अंतर्गत ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ना. बच्चू कडू यांनी आज न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अनुषंगाने आज झालेल्या सुनावणीत त्यांना अटकपूर्व मंजूर झाला आहे. ना. कडू यांच्या कडून ऍड. बि.के.गांधी यांनी काम पाहिले. या खटल्यातील पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!